White दुखामध्ये माझी माय,तरी हसते ग गाली उन्हामध्ये तिचे लेकरू तिच्याकडे ग पाही.... किती सोसल्या यातना किती आहे तिचे कष्ट तरी सर्वांचे करत गेली ना झाली कधी रुष्ट.... ना उरले काही तिच्या आयुष्यात गोष्ट आहे अशी, जगते ती बापाविणा काय माहित कशी.... विचारते माझी माय बापाविन तुझ्या मी कशी राहू, जग दुनिया दिसते मला सारी पण त्यांना कुठे पाहू.... उरामध्ये तिच्या दडलेले आहेत अश्रु अनेक, दुःख तिचे हलके करते,तिची लाडाची मी लेक..... ©Anisha Kiratkarve #sad_quotes माझी माय....