रोज 9-10 ला होणारी सकाळ आजच्या दिवशी मात्र लवकर घरात दिसायची कारण आमच्या बंधुराजांना हातभर राखी बांधून ती शाळेत मिरवायची असायची....'तू गप गं तुला काय कळतंय' म्हणत स्वतःच्या चित्रविचित्र पसंतीचीच राखी दटवून हातात बांधायला लावणारी ही हीच ती सकाळ असायची...आजचं जेवण तूच बनवायचं...मी सांगेल तसं ऐकायचं ...एवढं सगळं केलं तरच ओवाळणीची केस बंधुराजांच्या कोर्टात दाखल व्हायची...वर्षभर भांडणात केलेल्या सरेची आज मात्र ओवाळणी घेताना पुरती कसर निघायची....तरीही या अवखळ निखळ भांडणातून आनंदाचीच नदी वाहायची... ~श्रेयाG✍️ HAPPY RAKSHABANDHAN👩❤️👨👫 ©worldofpoetry__ #rakhipornima #Rakhi