Nojoto: Largest Storytelling Platform

*पंख छाटले माझे जरीही* *उमेद काही हरली नाही* *नकोत

*पंख छाटले माझे जरीही*
*उमेद काही हरली नाही*
*नकोत कुबड्या सहानुभूतीच्या*
*खंबीर उभी कोसळले नाही...*

*भार पेलले किती सोसले*
*उर फुटला परी ना कण्हले*
*श्वास भरुनी जगू दे आता*
*कोठडीत त्या मजसी कोंडले..*.

*विस्तीर्ण मोकळे निळे जांभळे*
*खुणावते आकाश वेगळे*
*पायवाट ती नकोच उसनी*
*मार्ग स्वतःचा मला आकळे...*

*घाव घालून मीच तोडले*
*पाश बेगडी सर्व सोडले*
*स्वाभिमान ना गहाण आता*
*लाचारीचे वस्त्र फेडले...*

*आक्रोशाचे गीत युगांचे*
*कधी तुझ्या कधी माझ्या ओठी*
*गाणारे जरी कंठ बदलले*
*मूळ वेदना एकची पोटी...*

©Shankar Kamble #स्त्री #स्त्रीत्व #स्त्रीजीवन #बाई #बाईच्या_जातीने #घुसमट #बाईपणाच्या 

#betrayal
*पंख छाटले माझे जरीही*
*उमेद काही हरली नाही*
*नकोत कुबड्या सहानुभूतीच्या*
*खंबीर उभी कोसळले नाही...*

*भार पेलले किती सोसले*
*उर फुटला परी ना कण्हले*
*श्वास भरुनी जगू दे आता*
*कोठडीत त्या मजसी कोंडले..*.

*विस्तीर्ण मोकळे निळे जांभळे*
*खुणावते आकाश वेगळे*
*पायवाट ती नकोच उसनी*
*मार्ग स्वतःचा मला आकळे...*

*घाव घालून मीच तोडले*
*पाश बेगडी सर्व सोडले*
*स्वाभिमान ना गहाण आता*
*लाचारीचे वस्त्र फेडले...*

*आक्रोशाचे गीत युगांचे*
*कधी तुझ्या कधी माझ्या ओठी*
*गाणारे जरी कंठ बदलले*
*मूळ वेदना एकची पोटी...*

©Shankar Kamble #स्त्री #स्त्रीत्व #स्त्रीजीवन #बाई #बाईच्या_जातीने #घुसमट #बाईपणाच्या 

#betrayal