Nojoto: Largest Storytelling Platform

निजिॅव वस्तूंसोबत आपण किती वेळ घालवला यावरून आपण त

निजिॅव वस्तूंसोबत आपण किती वेळ घालवला यावरून आपण त्या वस्तूंसोबत किती जोडले गेलो आहोत यांचा निर्णय होत नाही...
काही मिनिटसुद्धा पुरेशी असतात हो त्या वस्तूं सोबत "ATTACH"होण्यासाठी...कारण त्या निजिॅव वस्तूच कधी आपल्याला काही आठवणी देऊन जातात तर कधी आपल्या काही आठवणींच्या त्या साक्षीदार होऊन जातात...
आणि मुख्य म्हणजे त्या आपल्याला
"JUDGE" नाही करत...
कारण त्यांना बोलता येत नाही अस नाहीये तर, त्यांची निवड आपण केलेली असते आणि ही एकतर्फी निवड असते,त्यांच अस्तित्व आपल्यावर अवलंबून असत कदाचित याची जाणीव त्यांना असते, आणि कधी काही निजिव वस्तू आपल्या गरजा पूर्ण करूनही आपल्या सोबत  असतात... 
पण सजीवांच्या बाबतीत पुष्कळदा "ATTACHMENT" आणि "IMPORTANCE" आपण त्या व्यक्तीसोबत किती वेळ घालवला किंवा किती वेळ सोबत आहोत यावर अवलंबून असते, हा काही व्यक्ती अपवाद असतात या तत्त्वाला...
व्यक्तींच अस्तित्व क्षणभंगुर असत,कारण त्यांना बोलता ही येत, आणि त्यांना गरजेपुरती निवड करण्याची मुभा ही असते...
सगळ्यात मोठा फरक जो मला जाणवलेला आणि कदाचित तुम्हालाही कधीतरी जाणवला असेल तो म्हणजे, निजिव वस्तूमध्ये ,शरीराने जिवंत पण मनाने मेलेल्या व्यक्तींना पुन्हा जगण्याची उमेद निर्माण करण्याची क्षमता असते,आणि सजीव व्यक्तींमध्ये जिंवत व्यक्तीला जिवंतपणीच मारण्याची  ताकद असते...आणि ती खुप भयानक असते...
          ✍प्रतिक्षा सदाशिव तिटकारे✍

©Titkare Pratiksha Sadashiv Attachment And Importance

#vacation