Nojoto: Largest Storytelling Platform

पुन्हा पुन्हा बावरतो जेंव्हा जेंव्हा तुझ्या बटांन

पुन्हा पुन्हा बावरतो

जेंव्हा जेंव्हा तुझ्या बटांना असा मी सावरतो
मृदुल करांच्या तव स्पर्शाने पुन्हा पुन्हा बावरतो
**
ते नयन टपोरे गाल गोबरे निळी सावळी काया
देहावरल्या यौवनानी कशी भारली छाया
रसरसलेल्या या तनुला अलवार आलिंगाया
तव लालगुलाबी मृदुल ओष्ठांना चुंबून चुंबून घेतो

मृदुल करांच्या तव स्पर्शाने पुन्हा पुन्हा बावरतो
**
 मंद मंद या किरणांनी मृदुल मंजूळ वाणी
 सांजसकाळी तुझीच आठवण तुझीच गातो गाणी
 या जन्मी ना जरी लाभली तुच होशील राणी
 तव नाजूक तनूला घेता मीठीत हा मी शहारतो

मृदुल करांच्या तव स्पर्शाने पुन्हा पुन्हा बावरतो
**
 पुन्हा पुन्हा मी बावरतो..