Nojoto: Largest Storytelling Platform

गूज मनीचे... मन उडाले आकाशी येई अंगावर शहारे, घेत

गूज मनीचे...

मन उडाले आकाशी
येई अंगावर शहारे,
घेती कवेत मजला
गार मोसमी हे वारे..

अल्लड खट्याळ लाटांनी
माझ्या मनाला छेडीले,
बाई दुःखाचे डोंगर
अर्ध्या क्षणात मोडीले..

कुण्या स्वप्नात ओढते
थंड गुलाबी ही हवा,
येई अलवार उडून
गोड आठवांचा थवा..

माझ्या मनाचे गुपीत
गाणं गाऊन जपले,
कुण्या उनाड पाखरानी
माझे क्षण हे टिपले..

मन तळ्यात मळ्यात
ये रे कवेत पाखरा,
खूले मोकळे आकाश
साद घालीतो किनारा..

copyright-कवी के. गणेश
               ९०२८११०५०९ गूज मनीचे....
गूज मनीचे...

मन उडाले आकाशी
येई अंगावर शहारे,
घेती कवेत मजला
गार मोसमी हे वारे..

अल्लड खट्याळ लाटांनी
माझ्या मनाला छेडीले,
बाई दुःखाचे डोंगर
अर्ध्या क्षणात मोडीले..

कुण्या स्वप्नात ओढते
थंड गुलाबी ही हवा,
येई अलवार उडून
गोड आठवांचा थवा..

माझ्या मनाचे गुपीत
गाणं गाऊन जपले,
कुण्या उनाड पाखरानी
माझे क्षण हे टिपले..

मन तळ्यात मळ्यात
ये रे कवेत पाखरा,
खूले मोकळे आकाश
साद घालीतो किनारा..

copyright-कवी के. गणेश
               ९०२८११०५०९ गूज मनीचे....