Nojoto: Largest Storytelling Platform

दोन पाखरांचा संसार त्याला फांदीचा आधार घरटे होते

दोन पाखरांचा संसार
त्याला फांदीचा आधार 
घरटे होते ते सुंदर 
पिल्ले होती तयांची चार 
चिमणा चिमणी ती कष्टाळू
वाट पाहे घरट्यामध्ये पिल्लू 
जिवाची होई घालमेल
पण पिल्लांसाठीच तडफड
एक दिवस तो आला
चिमण्याचे पंख गेले वाया
चिमणी करे गयावया
चिमणा झाला मनानेही अपंग
चिमणी म्हणे मीआहे तुम्हासंग
दुनिया आहे ही रंगीन
तीचा लागे ना निभाव
ती एकटी बिचारी 
पेलवेना तीला जबाबदारी 
नियतीच्या मनात भलतेच 
होत्याचे नव्हते  झाले 
चिमणी गेलं सारं सोडून 
पिल्लांना पोरकी करून 
चिमणा सांभाळे कसाबसा 
पिल्लांना आधार होता त्याचा
दोन पिल्लू झाले मोठे 
बांधले स्वतःचे घरटे
मग चिमणाही गेला 
पिल्लांना एकटे टाकून 
दोन जीव ती लहान 
पडला त्यांच्यावर आकांत
जगणे होते ते कठीण 
पदरात पोरकेपण
पण जिद्द नाही सोडली 
या दुनियेशी लढली
मोठी झाली  दोघेही 
एकमेकांना सांभाळत
चारही पाखरे सुखाने 
आनंदाने नांदू लागली 
पण  तरीही शोधे नजर
कुठे  दिसतील  का
आमची  बाबा  अन् आई
कुठे  दिसतील  का
आमची  बाबा  अन् आई
    विद्या  पाटील घरटे
दोन पाखरांचा संसार
त्याला फांदीचा आधार 
घरटे होते ते सुंदर 
पिल्ले होती तयांची चार 
चिमणा चिमणी ती कष्टाळू
वाट पाहे घरट्यामध्ये पिल्लू 
जिवाची होई घालमेल
पण पिल्लांसाठीच तडफड
एक दिवस तो आला
चिमण्याचे पंख गेले वाया
चिमणी करे गयावया
चिमणा झाला मनानेही अपंग
चिमणी म्हणे मीआहे तुम्हासंग
दुनिया आहे ही रंगीन
तीचा लागे ना निभाव
ती एकटी बिचारी 
पेलवेना तीला जबाबदारी 
नियतीच्या मनात भलतेच 
होत्याचे नव्हते  झाले 
चिमणी गेलं सारं सोडून 
पिल्लांना पोरकी करून 
चिमणा सांभाळे कसाबसा 
पिल्लांना आधार होता त्याचा
दोन पिल्लू झाले मोठे 
बांधले स्वतःचे घरटे
मग चिमणाही गेला 
पिल्लांना एकटे टाकून 
दोन जीव ती लहान 
पडला त्यांच्यावर आकांत
जगणे होते ते कठीण 
पदरात पोरकेपण
पण जिद्द नाही सोडली 
या दुनियेशी लढली
मोठी झाली  दोघेही 
एकमेकांना सांभाळत
चारही पाखरे सुखाने 
आनंदाने नांदू लागली 
पण  तरीही शोधे नजर
कुठे  दिसतील  का
आमची  बाबा  अन् आई
कुठे  दिसतील  का
आमची  बाबा  अन् आई
    विद्या  पाटील घरटे

घरटे