Nojoto: Largest Storytelling Platform

चला ताई आणि चला भाऊ विकास गावाचा हाती घेऊ एकजुटीने

चला ताई आणि चला भाऊ
विकास गावाचा हाती घेऊ
एकजुटीने मतदानाला जाऊ
सेवक समाजाचा निवडुन देऊ

राजकारण मागचे विसरुन जाऊ
पक्षपात सोडुनी एकत्र येऊ
शपत जनकल्याणाची घेऊ
पुन्हा नव्याने ऊभे राहु
सेवक समाजाचा निवडुन देऊ

प्रश्न आपले मांडुन ठेऊ
वचनपत्र  पुर्णत्वाचे लिहुन घेऊ
दुरअवस्था खेड्यांची दाखवुन देऊ
मतदारांनो सावध होऊ
सेवक समाजाचा निवडुन देऊ

मतमागणार्याची जरा हजेरी घेऊ
मागिल कामांचा पाठपुरावा पाहु
महत्वाची कामे दाखवुन देऊ
आवाज आपला सर्वांपर्यत नेऊ
सेवक समाजाचा निवडुन देऊ

भविष्य तालुक्याचे योग्य हातात ठेऊ
सर्वांसाठी वाहुन घेणार्याला पुढे नेऊ
निर्णय मतदानाचा काळजीपुर्वक घेऊ
विकासासाठी प्रत्येकाने हातभार लावु
सेवक समाजाचा निवडुन देऊ.

       -   राहूल गोसावी चला हक्क गाजवु
चला ताई आणि चला भाऊ
विकास गावाचा हाती घेऊ
एकजुटीने मतदानाला जाऊ
सेवक समाजाचा निवडुन देऊ

राजकारण मागचे विसरुन जाऊ
पक्षपात सोडुनी एकत्र येऊ
शपत जनकल्याणाची घेऊ
पुन्हा नव्याने ऊभे राहु
सेवक समाजाचा निवडुन देऊ

प्रश्न आपले मांडुन ठेऊ
वचनपत्र  पुर्णत्वाचे लिहुन घेऊ
दुरअवस्था खेड्यांची दाखवुन देऊ
मतदारांनो सावध होऊ
सेवक समाजाचा निवडुन देऊ

मतमागणार्याची जरा हजेरी घेऊ
मागिल कामांचा पाठपुरावा पाहु
महत्वाची कामे दाखवुन देऊ
आवाज आपला सर्वांपर्यत नेऊ
सेवक समाजाचा निवडुन देऊ

भविष्य तालुक्याचे योग्य हातात ठेऊ
सर्वांसाठी वाहुन घेणार्याला पुढे नेऊ
निर्णय मतदानाचा काळजीपुर्वक घेऊ
विकासासाठी प्रत्येकाने हातभार लावु
सेवक समाजाचा निवडुन देऊ.

       -   राहूल गोसावी चला हक्क गाजवु