Nojoto: Largest Storytelling Platform

थांबावं थोडं चालता चालता कधीतरी. आणि करावा विचार स

थांबावं थोडं चालता चालता कधीतरी. आणि करावा विचार साऱ्याच गोष्टींचा. मग आवडत असो किंवा नसो.शेवटी किती टळणार स्वतःच स्वतःला. गुंता सुटत नाही म्हणून त्या गुंत्यासोबतच जुळवून घेणं हे कितपत योग्य आहे..? कधीतरी त्रास होणारच. आज न उद्या जे व्हायचंय ते होणारच. शेवटी कर्माचा खेळ आहे महाराज आज न उद्या फळ मिळणारच. गुंता सोडवायचा म्हणजे काय..? भांडायच स्वतःच स्वतःशी…? की पळून जायचं…? छे…! अगदीच नाही. मग नेमकं काय..? तर संवाद साधायचा स्वतःच स्वतःशी. वेडेपणाचे लक्षण म्हणतील लोक. पण स्वतःशी बोलायचं राहून गेलं तर अनेक प्रश्नांची उत्तरं शोधून देखील सापडणार नाही. एकांतात म्हणे स्वतःच शोध लागतो. शेवटी काय चुकीचं आणि काय बरोबर हे ज्याने त्याने ठरवावं. आपलं कस आहे गुंता सुटला म्हणजे झालं नाहीतर सवय व्हायची नको असलेल्या गोष्टींची.
                                               -राणी साळुंके

ranisalunke2496

Rani Salunke

New Creator