Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम भक्ती खांद्यावरी घेऊन ओझे, सुरू आहे जीवन म

प्रेम भक्ती 

खांद्यावरी घेऊन ओझे, सुरू आहे जीवन माझे..
विठुच्या चरणी अर्पण जे, असे फुल मी एक ताजे...
हृदयांगणी फेर धरून, अनाहताचा टाळ वाजे...
आतल्या गाभाऱ्यात, माझी प्राणसखी विराजे...

आपसूक वाकतो झुकतो , आनंदाने उड्या मारतो..
प्रत्येक कृती अकृतीतून, तीस अभिवादन करतो...
प्रेम काय अन भक्ति काय, माझं काम चोखपणे पार पाडतो..
अहंकाराचे श्रीफळ दोहोंच्या चरणी, न चुकता फोडतो...

Vishaal/Aadinaath 
19-07-21

©Vishal Chavan #प्रेम #भक्ति