Nojoto: Largest Storytelling Platform

सोन्याचा घास होता माझा कारे द्वाडा हिरावलास घोट तर

सोन्याचा घास होता माझा
कारे द्वाडा हिरावलास
घोट तर घ्यावा वाटतोय, पाणी न्हाय तुझ्या नरडीचा
घासात माती मातीत घास कालवलास

एक तर तुझ्याइना कसली मातीमाय घामानंच
तुझ्याकडं येळ न्हाय, तू येतोस बापडा दमानंच
तरीबी आस आन डोळ लावून कास धरली, मन अन मनगटानंच
राबायचं भ्या न्हाय रं, चिक्कार दम उरलाय कर्मानंच
कष्टाचं पाणी आन कष्टावर पाणी, गड्या आस्स्स व्हयं जमवलंस
घासात माती मातीत घास कालवलंस

हाय की गड्या तुझाबी, आमच्या घासात शिव्हाचा वाटा
बाप...बापच तू आभाळाएवढ्या मायेचा, शिव्हापरी तुझ्या दातांचा कचाटा
म्हणून काय शिव्हावानीच झडप घालून करशील घास उष्टा
आर्रर्रर्र का नाही दिसत तुला रक्ताचं पाट वाहणारा, काळीज चिरणारा काटा
तुझ्या लेकरास्नी दिलेलं बापडा, तुझं तूच हिसकावलंस  
घासात माती मातीत घास कालवलंस

आता कुठं उगवलं होतं, सोन्याचं पातं
लेकुरवाळी माती माय आन तुझं बापाचं नातं
अंगणाला सारावलं, नांदण्याला चांदणं शिंपडलं व्हतं
हातातोंडाशी सगळं, सोनेरी रंगात न्हालं बैलगाड्याचं रथ
पर तूच दृष्ट लावलीस आन होत्याचं नव्हतं केलंस
घासात माती मातीत घास कालवलंस

पोटाची भूक भागवायच्या कर्तव्याला आमी एकनिष्ठ
तुझी निष्ठा कुठं कमी पडली, सगळं एका झटक्यात केलं नष्ट
बाप म्हणून भय तर व्हतच, प्रलय दावून प्रमाण दिलंस स्पष्ट
तू झोडपलं आन नियतीनं सडकलं, दोन्हीबी नशिबाला खाष्ट
गणगोत तर नाही पर उरलंसुरलं नातं तुझ्यासोबतचं पण उसवलंस
घासात माती मातीत घास कालवलंस #rayofhope #rain #farmers #unwantedrain Deva vachav shetkaryana

kiransuryawanshi5940

rayansh

New Creator