#OpenPoetry "संगत तर सगळ्यांशीच करायची असते. कुणी लहान किंवा मोठं, गरीब -श्रीमंत बघायचं नसते. कारण, काम आपल्याला सगळ्यांशी पडतो. पण, ज्ञानी, विद्वान लोकांच्या संगतीत राहिल्याने, बराच काही शिकायला, अनुभवायला मिळतं. आपल्या मनाची सर्व्हिसिंग होते. आपल्याला त्रास देणारे, अहंकारी बनवणारे, अस्वस्थ करणारे, मन घाण करणारे वाईट विचार मनातून निघून जातात. आणि आपल्याला जीवन जगायला एक नवीन चेतना मिळते. आणि म्हणूनच ज्ञानी, विद्वान लोकांची संगत केव्हाही फायदेशीर ठरते. (प्रीत )