Nojoto: Largest Storytelling Platform

तांदूळ.. तुझ्या डोक्यावर अक्षता पडल्या.. माझ्या घर

तांदूळ..
तुझ्या डोक्यावर अक्षता पडल्या..
माझ्या घरातला तांदूळ थरथरला..
राशनचा तांदूळ, जो तू खाणार होतीस..
त्या शुभ्र तांदळाचा, खूप ऊर भरला...

झोपडीत राहू प्रेमाच्या ऊबीत..
म्हणाली होतीस, तुझ्या खास ढबीत...
एकाकी आहेत आता कविता माझ्या..
एकाकी पडलय प्रेमाच गीत...

तो रामलिंग; जिथं आपण शेवटच भेटलो..
मी गेल्यावर, राम अन शिव लाजतात...
म्हणतात, तुलाच समजायला हवं होतं..
खूप प्रेम दिल्यावर, लोक असे माजतात...

एक रुद्राक्ष आहे, जो तुझ्या गळ्यात शोभणार होता..
त्याला पावन होण्याचा, एक दुर्लभ मोका लाभणार होता...
तो आजकाल, माझ्या पँटच्या खिशात लुडबुडत राहतो..
त्याला कदाचित माहीत होतं, तो माणूस तसाच वागणार होता...

त्या गूंजच्या लाल-लाल बिया, तू मला दिलेल्या..
जणू गरिबाचा सुवर्ण अलंकार, पिढ्यानपिढ्या जतन केलेला...
मी तुला प्रेमाची, वत्सल आई समजत होतो..
आता प्रेमाला मृत गर्भ म्हणतो, अवेळी व्यालेला...

Vishaal/Aadinaath 
07-02-2022

.

©Vishal Chavan #तांदूळ 

#teddyday