White आपल्या नात्याला पुरेसा वेळ द्या म्हणजे दुसऱ्या कोणासाठी वेळ उरणार नाही आपला माणूस तिथेच असेल उभा कायम आणि परका माणूस मरेपर्यंत पुरणार नाही.... माणूस समजायला सहवास महत्वाचा असतो फार दुरून सहजासहजी माणूस कळणार नाही दुरावला जर एकदा प्रेम करणारा कायमचा तेव्हा दुसरं तर मिळेल पण तो मिळणार नाही... वेळेत नात्याची किंमत समजा नात्याला ओळखा असे नाते कधीच दुरावणार नाही नात्यात तितकीच वेळ आणि प्रेम दया मग तो देव ही प्रेमासाठी झुलवणार नाही.... वेळ कधीच बसून राहात नाही आपल्यासाठी म्हणून एकदा गेलेला माणूस परत मिळत नाही आणि हेच सत्य आहे माणसांची किंमत निघून गेल्याशिवाय कळत नाही... देव ही परीक्षा घेतो आपली माणसे भेटवून पण ते नाते टिकवणं प्रत्येकाला जमत नाही नातं जपण्यासाठी त्या नात्याची किंमत ओळखावी लागते आयुष्यात सहजासहजी आणि करणाशिवाय कुणीही येत नाही... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #safar