Nojoto: Largest Storytelling Platform

देह मायेचा झिजला फाळ नांगराचा शिरे काळजात आरपार

देह मायेचा झिजला

फाळ नांगराचा शिरे 
काळजात आरपार 
देह मायेचा झिजला 
तेंव्हा पिकलं शिवार ||१||

माती ढेकळाची होई 
रानं मऊसर दिसे 
बैल जुंपू पांभरीला 
मुठ चाड्यावर हसे ||२||

मागे किडे खाण्या येती 
फौज घेऊन बगळे
बाळ झोक्यातून पाहे 
कसे? राबती सगळे ||३||

औत हाकता म्हणतो 
सर्जा राज्याची हो गाणी
संगे शिवार डोलता 
नभ गाळतो रे पाणी  ||४||

गेली दमून सांजेला 
पळ काढती घराला 
रानं निजले काळोखी 
दाणे अंकुरे तासाला  ||५||

काळ्या मायेची ही कुस 
सुख घालते जन्माला 
नको घाबरू तू धन्या! 
आला बहर तुऱ्याला ||६||

कवी पंडित निंबाळकर 
मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव 
जि अहमदनगर ७९७२५२३७१७

©Pandit Nimbalkàr
  #panditnimbalkar #poem #shetkari #sheti
देह मायेचा झिजला

फाळ नांगराचा शिरे 
काळजात आरपार 
देह मायेचा झिजला 
तेंव्हा पिकलं शिवार ||१||

माती ढेकळाची होई 
रानं मऊसर दिसे 
बैल जुंपू पांभरीला 
मुठ चाड्यावर हसे ||२||

मागे किडे खाण्या येती 
फौज घेऊन बगळे
बाळ झोक्यातून पाहे 
कसे? राबती सगळे ||३||

औत हाकता म्हणतो 
सर्जा राज्याची हो गाणी
संगे शिवार डोलता 
नभ गाळतो रे पाणी  ||४||

गेली दमून सांजेला 
पळ काढती घराला 
रानं निजले काळोखी 
दाणे अंकुरे तासाला  ||५||

काळ्या मायेची ही कुस 
सुख घालते जन्माला 
नको घाबरू तू धन्या! 
आला बहर तुऱ्याला ||६||

कवी पंडित निंबाळकर 
मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव 
जि अहमदनगर ७९७२५२३७१७

©Pandit Nimbalkàr
  #panditnimbalkar #poem #shetkari #sheti