Nojoto: Largest Storytelling Platform

White मोकळ्या आकाशी.. मोकळ्या आकाशी मुक्त नभाशी ह

White मोकळ्या आकाशी..

मोकळ्या आकाशी मुक्त नभाशी
हितगुज मला करावयाचे आहे
व्रत करुनिया सत्त्व राखूनिया
मलाच माझे व्हावयाचे आहे

हवा कशाला घोर फुकाचा
कोण इथे आहे का कुणाचा
स्वार्थी बरबटलेल्या या जगी
अर्थ समजतो कोण मौनाचा
जोखड सांभाळले आजवरी
दूरवरी मला फेकावयाचे आहे
व्रत करुनिया सत्त्व राखुनिया
मलाच माझे व्हावयाचे आहे

फापटपसारा हा विचारांचा
झोंबतो त्रागा किती अंतरीचा
संकल्पाविना ना सिद्धी लाभते
मंत्र असे हा सुखी जीवनाचा
करुनिया प्रण नियंत्रित मन
आता मजला राखावयाचे आहे
व्रत करुनिया सत्त्व राखूनिया
मलाच माझे व्हावयाचे आहे.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor
  #Emotional मोकळ्या आकाशी मुक्त नभाशी
हितगुज मला करावयाचे आहे
व्रत करुनिया सत्त्व राखूनिया
मलाच माझे व्हावयाचे आहे

हवा कशाला घोर फुकाचा
कोण इथे आहे का कुणाचा
स्वार्थी बरबटलेल्या या जगी

#Emotional मोकळ्या आकाशी मुक्त नभाशी हितगुज मला करावयाचे आहे व्रत करुनिया सत्त्व राखूनिया मलाच माझे व्हावयाचे आहे हवा कशाला घोर फुकाचा कोण इथे आहे का कुणाचा स्वार्थी बरबटलेल्या या जगी #कविता

117 Views