Nojoto: Largest Storytelling Platform

#माणूस_म्हणून_चुकलेला_बाप..? (पार्ट-3) विदाईच्या

#माणूस_म्हणून_चुकलेला_बाप..?
(पार्ट-3)

विदाईच्या क्षणाला बापाच्या मिठीत
धाय मोकलून रडताना 
बापाला वाटतं
पोरीनी लवकर जावं...जास्त रडू नये..
आणि पोरीला वाटतं
शेवटची मिठी आहे बापाने असा
एकाएकी हक्क सोडू नये..?
" लेक " नावाच ओझं उतरून बाप हलका होतो
आणि लेकीची पावलं जड..

लहानपणापासून
डोळ्यांच्या धाकात वाढलेल्या 
पोरीच्या डोळ्यांत डोळे घालून 
बाप पाहू शकत नाही ..
कारण 
"बाप" म्हणून बरोबर असलेला बाप,
 "माणूस" म्हणून चुकलेला असतो..?

    -बंटीराज पवार #WatchingSunset
#माणूस_म्हणून_चुकलेला_बाप..?
(पार्ट-3)

विदाईच्या क्षणाला बापाच्या मिठीत
धाय मोकलून रडताना 
बापाला वाटतं
पोरीनी लवकर जावं...जास्त रडू नये..
आणि पोरीला वाटतं
शेवटची मिठी आहे बापाने असा
एकाएकी हक्क सोडू नये..?
" लेक " नावाच ओझं उतरून बाप हलका होतो
आणि लेकीची पावलं जड..

लहानपणापासून
डोळ्यांच्या धाकात वाढलेल्या 
पोरीच्या डोळ्यांत डोळे घालून 
बाप पाहू शकत नाही ..
कारण 
"बाप" म्हणून बरोबर असलेला बाप,
 "माणूस" म्हणून चुकलेला असतो..?

    -बंटीराज पवार #WatchingSunset