Nojoto: Largest Storytelling Platform

दादू जन्म तुझा नि माझा एका नाळेत होता विणलेला क्षण

दादू जन्म तुझा नि माझा
एका नाळेत होता विणलेला
क्षणा क्षणात आयुष्यातला
धागा तुझ्याशी जुळलेला

जन्म घेतांना पुढे येऊन 
मोठा मान तू घेतला
तुला कचऱ्यातून आणलं
अस म्हणून चिडवायला लागला

बोबडे बोलही अस्पष्ट सोबत बोलला
शाळेत एका लेखणीचे दोन 
तुकडे करून लिहायला लागलो
भांडताना मात्र कधीच नाही हरला

शाळेतही पहिला क्रमांक
 नेहमीच पटकावला,
पण माझी बहिण हुशार
असे सांगायला लागला

कळत नाही इतका कसा 
प्रेमळ भाऊ देवाने दिला
की मागच्या जन्मतःच 
मागितले होते मी तुला

कवितेत लिहू कसे शब्द 
आपलं नात पूर्ण व्हायला
हातावरच्या राखीचेही 
पडतील धागे कमी 
प्रेम माझं बांधायला

आज या रक्षाबंधनाच्या 
दिवशी एक बहीण वचन
मागते तुला
हट्ट कधीच करणार नाही
पण लग्ना नंतर घरी बोलवशील 
ना रे मला? दादू#बंध#प्रेम#राखी
दादू जन्म तुझा नि माझा
एका नाळेत होता विणलेला
क्षणा क्षणात आयुष्यातला
धागा तुझ्याशी जुळलेला

जन्म घेतांना पुढे येऊन 
मोठा मान तू घेतला
तुला कचऱ्यातून आणलं
अस म्हणून चिडवायला लागला

बोबडे बोलही अस्पष्ट सोबत बोलला
शाळेत एका लेखणीचे दोन 
तुकडे करून लिहायला लागलो
भांडताना मात्र कधीच नाही हरला

शाळेतही पहिला क्रमांक
 नेहमीच पटकावला,
पण माझी बहिण हुशार
असे सांगायला लागला

कळत नाही इतका कसा 
प्रेमळ भाऊ देवाने दिला
की मागच्या जन्मतःच 
मागितले होते मी तुला

कवितेत लिहू कसे शब्द 
आपलं नात पूर्ण व्हायला
हातावरच्या राखीचेही 
पडतील धागे कमी 
प्रेम माझं बांधायला

आज या रक्षाबंधनाच्या 
दिवशी एक बहीण वचन
मागते तुला
हट्ट कधीच करणार नाही
पण लग्ना नंतर घरी बोलवशील 
ना रे मला? दादू#बंध#प्रेम#राखी
samrudhisawarkar6617

....

New Creator