Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्यात दरवळणारा मला तुझा प्रत्येक श्वास व्हायचं आ

तुझ्यात दरवळणारा मला तुझा प्रत्येक श्वास व्हायचं आहे,
तुझ्यात धढधढणारें मला तुझे हृदय व्हायचं आहे,
तुझ्यात वाहणाऱ्या मला तुझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब व्हायचं आहे,
तुझ्या डोळ्यातून उमळणारे मला तुझे प्रतिबिंब व्हायचं आहे...
जीवनाच्या अंतरेखात मला तुझा शिल्पकार व्हायचं आहे...

प्रत्येक पावलात मला तुझ्या सोबत चालायचं आहे,
तुझ्या प्रत्येक भरारित मला तुझे पंख व्हायचं आहे,
तुझ्या प्रत्येक स्वप्नात मला तुझे विचार व्हायचं आहे,
शेवटचा श्वास मला फक्त तुझ्या सोबत घ्यायचं आहे...
आयुष्याचा प्रत्यक्ष मला तुझा सार्थक व्हायचं आहे...

प्रत्येक पावसात मला तुझ्यासोबत भिजायचं आहे,
तापत्या उन्हात मला तुझ्यासाठी सावली व्हायचं आहे,
हिवाळी थंडीमध्ये मला तुझ स्वेटर व्हायचं आहे,
प्रत्येक सुख दुःखात मला तुझा सारथी व्हायचा आहे...
प्रत्येक ऋतु मधला मध्यभागी मला तुझासाठी व्हायचं आहे...

तुझ्यासाठी मला एक प्रेमाचं घरटं व्हायचं आहे,
तुझ्या प्रेमाचे मला प्रत्येक क्षण व्हायचं आहे,
तुझ्यात वास करणारे मला तुझे अंतरंग व्हायचं आहे,
तुझ्यात दरवळणारा मला तुझ्यातला गंध व्हायचं आहे...
तुझ्यासाठी मला तुझे संपूर्ण जग व्हायचं आहे...

...✍️रूपेश थुल #NojotoQuote #rupesh_thool #nojoto #my_story #love_story #first_love