Nojoto: Largest Storytelling Platform

कधीतरी जगून बघावं स्वतःसाठी पण, झुगारून द्याव्या प

कधीतरी जगून बघावं स्वतःसाठी पण,
झुगारून द्याव्या परक्या अपेक्षा,
निडर बनवावी नजर स्वतःची,
स्वतःची नवी वाट शोधताना।
कधीतरी मन मोकळं करावं,
तोडून टाकाव्या नाजूक शृंखला,
मुक्त होऊ द्यावे शब्द सारे,
व्यासपीठ स्वतःचे नवे बनवताना।
जगून पहावं स्वतःच आयुष्य,
स्वतःच्या मर्जीचे खांब उभारताना,
निर्णय घ्यावे चुकून पहावं,
कधीतरी स्वतःसाठी शून्यातून जग उभारावं।।
कधीतरी जगून बघावं स्वतःसाठी पण,
झुगारून द्याव्या परक्या अपेक्षा,
निडर बनवावी नजर स्वतःची,
स्वतःची नवी वाट शोधताना।
कधीतरी मन मोकळं करावं,
तोडून टाकाव्या नाजूक शृंखला,
मुक्त होऊ द्यावे शब्द सारे,
व्यासपीठ स्वतःचे नवे बनवताना।
जगून पहावं स्वतःच आयुष्य,
स्वतःच्या मर्जीचे खांब उभारताना,
निर्णय घ्यावे चुकून पहावं,
कधीतरी स्वतःसाठी शून्यातून जग उभारावं।।