शेतकरी श्रीमंत का होत नाही? लावा शेती, उगवा मोती सोबतीला ही काळी माती. रोज उठुनि भल्या पहाटी, अंगमेहनत ही शेतीसाठी. बियाणं गोळा करावं, मशागत करून पेरावं, पाऊस आला नाही तर शेतकऱ्यानं मरावं. बैलराजाच्या जोडीने चालू होते नांगरणी, कर्जातूनच सुरुवात डोळ्यात असते पाणी. एकामागे -एक दिवस निघून जातात, शेतामध्ये जाड-टपोरे मोती येतात. मोती आणायला जाव तर, पावसात वाहून जातात. ज्याचं पीक राहतं त्याला मिळत नाही भाव, शेतकरी राजा घेतो मग सरकारकडे धाव. आश्वासन सोडून शेतकऱ्याला मिळतंच नाही काही, शेतकरी राजा करतो मग आत्महत्येची घाई. सांगा पाहू शेतकरी कसा होईल श्रीमंत, शेतकरी जगाचा पोशिंदा सांगून गेलेत संत. अभिमान आहे, घराचा नाही शेतकरी विश्वाचा आहे धनी, किती लिहावं तरी अपूर्णच त्याची कहाणी! अपूर्णच त्याची कहाणी .... -हर्षल दत्तात्रय चौधरी ©Harsh #farmer #farmersday #shetkari #therealheroes