Nojoto: Largest Storytelling Platform

भंगल्या सुखांची मी घडी केली अन् आयुष्याच्या उशाशी

भंगल्या सुखांची  मी घडी केली
अन् आयुष्याच्या उशाशी ठेवत गेली!

दु:खांना दुखावले मी कधीच नाही 
दु:खातही हसण्याची करामत केली !

कितीदा बजावले मी  मनाला तरी
त्यानं पून्हा पून्हा इच्छांची तोरणे बांधली !

माझ्याच वळचणीला मी झाले अनोळखी 
गर्दी कुणा दुस-यांचीच दारात पाहिली !

मुक्त व्हावे त्याच्यातुनी मी  खुपदा ठरवते 
फक्त  सय त्याची येता पुन्हा जाते बांधली!

© पुष्पांजली कर्वे सय येताच त्याची पून्हा जाते बांधली! ❤#