आज भेटला तो पुन्हा त्याच वळणावर मला जिथे पहिल्यांदाच भेटली होती मी त्याला भाव त्याच्या नजरेत काही वेगळाच दिसला अपलेसा वाटणारा तो आज अनोळखीच भासला मला पाहून किंचित तो ही गालातच हसला कशी आहेस हळूच प्रश्न त्याने मला पुसला अबोल होते शब्द डोळ्यातील भाव डोळ्यांना कळला मनातील विरहाच्या दुःखाचा बांध आज फुटला हृदयातील प्रेम झरा कर्तव्य आणि जबाबदऱ्यांपुढे आटला त्याला भेटून आज डोळ्यातील आश्रू जणु डोळ्यातच गोठला प्रेमाचा त्याग करून आम्ही घरच्यांचा आणि संस्कारांचा मान राखला जात पात धर्मापायी आमच्या प्रेमाचा डाव आम्ही मोडला शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भेटली ती पुन्हा/भेटला तो पुन्हा.. #भेटली_ती_पुन्हा चला तर मग लिहूया. COLLAB करूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai