Nojoto: Largest Storytelling Platform

#देवाचे अस्तित्व.. तुझिया मंदिराच्या क्षेत्री वाजत

#देवाचे अस्तित्व..
तुझिया मंदिराच्या क्षेत्री वाजतो नगारा
तुझिया अस्तित्वाचा हाती आपसुकपणे भेटतो पुरावा
सर्वत्र तू निशिदिनी जागृत तुझी कीर्ती अन् किरपा आम्हा लेकरांवरी
तरीही घेशी रात्री झोप तू शांतपणे मंदिरी 
जागविती तुज नित्य सकाळी झोपविती रात्री
भक्त पुजारी तुझी करिताती चोखपणे चाकरी 
उत्सव समयी सजलेली तुज पालखी आवडते
संचारशी कसा मनुजाअंगी याचेही मज नवल वाटते 
प्रसाद घेती कुणी श्रद्धेने मागुनि मुर्तीकडे
न बोलताही देशी कसा तू मग अगदी अचूक उत्तरे 
तुजसाठी चालती कितीतरी उत्सव शुभ सोहळे
बहरती तुजपुढती देवा भक्तीफुलांचे हे मळे
माणसांच्या रुपातही तू येशी भेटायला 
कधी ओळखले सहज तुला कधी झाले फसायला
सर्वव्यापी तू सर्व दिशांना तरीही शोधिती जन जागोजगी तुला 
तू प्रत्यक्ष दिसावा हीच आस प्रत्येक भाविकाला
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #NojotoRamleela