टॉम अँड जेरी (प्रिय बहिणीस समर्पित) मीच हुशार तू ढगोळी मी साजूक तूप तू पुरणाची पोळी दप्तर तुझं पण पाठीवर माझ्या चल म्हणतेस लवकर गाढवा माझ्या सांडलीस ना भाजी थांब आईलाच सांगते हाथा पाया पडतो मग ती उगाच भाव खाते ती टपली मारायची रोज पण रडायला जमायचं नाही माझ्या साध्या खोडीनेही तिचा भोंगा कधी थांबायचं नाही एका पानाला २ चॉकलेट असा भाव ती ठरवायची पण काहीच न घेता बिचारी निबंध लिहून द्यायची क्लास,धुनी भांडी अन त्यात अभ्यास सारं मी पाहायचो त्या पूर्णत्वाकडून मी अपूर्ण असलेला 'धैर्य' शिकायचो अगदी बाप आजारी असताना तिनं सोसलेलं आठवतं माझ्या शिक्षणापायी तिनं माघार घेतलेलंही आठवतं हळू हळू संसार नावाच्या जीवनात तू सुखाने नांदतेस आपल्या गोड कडू अनुभवाच्या गाठोड्यातही तू असतेस जगात सुंदर नातं आपलं जसं बिस्कीट अन खारी होय मी आहे टॉम आणि बहीण माझी जेरी रचनाकार, सुरेश गोविंद पवार #बहीण