#पत्र #पप्पा आई घराची माया. बाबा तू घरावरची छाया. मजबूत भिंती जर आई तर बाबा तू घराचे छप्पर. छपराशिवाय का असते सुरक्षित घर. हेच ते छप्पर जे सोसते उनपावसाचे प्रहार. थंडीवार्यातही ठेवते घराला उबदार. आईचे मोठेपण, पोटात सांभाळते जन्म देते सोसते कळ. अंश तुझाच असतो तो, तुझीही होतेच ना तळमळ. आई घराचा चेहरा तु पाठीचा कणा असतोस. कण्याशिवाय चेहर्याला आधार नसतो. कौतुक होत असते आईचे. तु ही सामील त्यात होतोस. श्रेय देता तुला, तुझ्या कष्टांचे, तु फक्त मुकपणे हसतोस. #पत्र #पप्पा #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales#bestyqmarathiquotes