Nojoto: Largest Storytelling Platform

कावळा शिवला ...... Lets talk,remove taboo.... चे न

कावळा शिवला ......
Lets talk,remove taboo....
चे नारे  कानावर पडले ..मनाच्या आकाशात भूतकाळाचे काळे ढग  दाटले 
14-15  वर्षाची असेन पहिल्यांदाच  स्कर्टवर लाल डाग दिसला .. आईला कळताच  तिचा चेहरा  काळजीच्या ,आनंदाच्या,चिंतेच्या  संमिश्र  भावनांनी माखला ...
ईकडे नको जाऊ ,देवाला नको शिवू , आज शाळेत नको जाऊ , शु ...बाबा -  दादा पुढे नको बोलू करत आजीकडून  सूचनांचा  वर्षाव  सुरु  झाला.. .
तिच्या म्हणण्यानुसार  मला आज 'कावळा शिवला ...
ताईने  हळूच पॅड दिले ,न तिच्या चेहऱ्यावरचे  सहानुभूतीचे  भाव माझ्या डोळ्यांनी  अचूक  टिपले ...
आज मलाही  तिच्यासारखेच पवित्र -अपवित्र, शुद्ध -अशुद्धतेच्या  कोर्टात समाजाच्या विचारांनी  उभे  केले ...
जशी मोठी होईल तशी त्या लाल रंगाने माझे सगळे  निरागसतेचा ,स्वतंत्र्याचे रंग माञ धूसर  केले ...
जुना ताकदवर  वृक्ष उपटला  तरी त्याच्या खोलवर  रुजलेल्या मुळ्या आपल्या खुणा मातीत सोडतातच ...
तसेच जुन्या  बुरसटलेल्या  विचारांच्या  मुळ्या मनाच्या मातीवर  खुणा ठेवतातच ...
ज्या लाल रक्ताचा  रावणाचा  अभिषेक  पवित्र वाटतो ..पण त्याच रक्तातला  तिचा साधा  स्पर्श हि तुम्हाला  बाटतो...
खरच हि रक्ताची  अपवित्रता  कि विचारांची ...नवजन्म देणारे  रक्त  अशुद्ध हे  कोणी ठरवले ...
पितृसत्तेच्या  आगीत  करपलेलं  तीच बाईपण  स्वीकारलं  पण माणुसकीच्याच जगात  तिला समानतेच्या  पायरीवरून  माणूस म्हणून  स्वीकारणं मात्र  राहूनच गेलं ....
_sensitive_ink_of Bhagyashri #taboo