माझे मत-- माझे विचार मित्रांनो, माणस माणसाच मन तथा त्याच्यामनोभावना कदापी ओळखू शकत नाही. हे पूर्णत: सत्य नसून, काही अंशी सत्य आहे. मानवी मन हे अतीशय चंचल अस्थिर,संवेदन- शील असल्यामुळे ,क्षणात आपले मनोभाव बदलत असतात. सबब त्या मनोभावना ओळखण्यासाठी आपल्यात स्थिर निरपेक्ष मनोभाव असणे अगत्याचे आहे. आपल्याला ते मनोभाव ओळखण्यासाठी आपले मनोभाव निर्भेद,निर्मल,निरपेक्ष तथा प्रभावहीन असणे आवश्यक आहे. अॅड. सूर्यवंशी