Nojoto: Largest Storytelling Platform

काल तू रडलीस तेव्हा.. माझेच नेत्र पाझरले होते.. ति

काल तू रडलीस तेव्हा..
माझेच नेत्र पाझरले होते..
तिथं खळकन सजले जेव्हा जलबिंदू 
इथं माझे पण नेत्र झरले होते...

परवाच्या पुणवेला, तू आनंदी होतीस बघ..
तेव्हा मी पण खूप आनंद भोगलाय...
तुझ्या त्या अल्हादीत आत्म्याने
इथं माझा कण अन कण  व्यापलाय...

उद्याचा तो उत्सव असो 
वा परवाची ती वेदना असो..
असंच रहावस तू माझ्यात..
माझाही अंश तुझ्यात वसो...

जेव्हा सहन नाही होणार तेव्हा समजून जा..
वेदना मला चीरुन तुझ्याकडे आलीय..
पहिला घाव माझ्याच गात्रांवर
तजवीज काही तशीच मी केलीय...

तुला तुझी प्रतिष्ठा मोठी..
माझ्यासाठी मोठी आपली प्रिती...
तुझा सखा ही आहे, मोठाच खमका..
तो भिडेलच सदा, जरी विरुद्ध नियती...








When Aadinatha Writes✍️.... #AadiSoham
काल तू रडलीस तेव्हा..
माझेच नेत्र पाझरले होते..
तिथं खळकन सजले जेव्हा जलबिंदू 
इथं माझे पण नेत्र झरले होते...

परवाच्या पुणवेला, तू आनंदी होतीस बघ..
तेव्हा मी पण खूप आनंद भोगलाय...
तुझ्या त्या अल्हादीत आत्म्याने
इथं माझा कण अन कण  व्यापलाय...

उद्याचा तो उत्सव असो 
वा परवाची ती वेदना असो..
असंच रहावस तू माझ्यात..
माझाही अंश तुझ्यात वसो...

जेव्हा सहन नाही होणार तेव्हा समजून जा..
वेदना मला चीरुन तुझ्याकडे आलीय..
पहिला घाव माझ्याच गात्रांवर
तजवीज काही तशीच मी केलीय...

तुला तुझी प्रतिष्ठा मोठी..
माझ्यासाठी मोठी आपली प्रिती...
तुझा सखा ही आहे, मोठाच खमका..
तो भिडेलच सदा, जरी विरुद्ध नियती...








When Aadinatha Writes✍️.... #AadiSoham