Nojoto: Largest Storytelling Platform

#गाथा_चिंतन सावध झालों सावध झालों ! हरिच्या आलो

#गाथा_चिंतन 

सावध झालों सावध झालों ! 
हरिच्या आलो जागरणा !!
जेथे वैष्णवांचे भार 
जयजयकार गर्जतसे !!
गाथा सेवक mp || सार्थ तुकाराम गाथा ||
        ||अभंग क्रमांक ३||
सावध झालो सावध झालो| हरिच्या आलो जागरणा||१||
जेथे  वैष्णवांचे भार|जयजयकार गर्जतसे||२||
पळोनिया गेली  झोप| होते पाप आड ते||३||
तुका म्हणे तया ठाया| वोल छाया कृपेची||४ ||

   भावार्थ-मी विचाराने निश्चित जागा झालो .म्हणून हरिच्या भजन जागारास आलो .||१||ज्या हरिजागरात वैष्णवांचे समुदाय हरिनामाचा घोष करीत होते ||२ ||त्या नामघोषाने माझी झोप पळून गेली आणि जे पाप भजनास आड आले होते तेही पळून गेले ||३ ||तुकाराम महाराज म्हणतात जेथे वैष्णवांचा हरिजागर चालतो त्या ठिकाणी देवाच्या कृपेची सुखद साऊली असते ||४ ||

nojotouser7765412532

mauli pawade

New Creator