*_एक कवडसा...*_ *_दाटला अंधार सभोवती*_ *सावलीचा मंद उसासा* *खिन्न गलबते सूना किनारा* *संथ चालतो एक कवडसा* *झाकोळले तेजाचे घरटे* *बंद कवाडे किती एकटे* *कुणी- कुणां द्यावा दिलासा* *शांत जोजवी एक कवडसा* *जायबंदी पंख छाटले* *डोळे धूसर मळभ दाटले* *लाख किल्मिषे भाव जरासा* *अंकुर फुलवी एक कवडसा* *किती प्रवासी येती जाती* *दोन घडीचा डाव मांडती* *क्षणभंगुर जग नसे भरवसा* *साथ सोबती एक कवडसा* *लोभ वासना बरबटलेले* *ग्रहण कधीचे ना सुटलेले* *मोक्ष आंधळा कुणां दिसावा* *अंजन घाली एक कवडसा* ©Shankar Kamble #कवडसा #सोबत #अंधार #एकाकी #जग #दुनिया #दुनियादारी #Lumi