Nojoto: Largest Storytelling Platform

#माणूस_म्हणून_चुकलेला_बाप..? (पार्ट-2) तू बोट ठेवश

#माणूस_म्हणून_चुकलेला_बाप..?
(पार्ट-2)
तू बोट ठेवशील ते तुझं "
ही धमक दाखवणारे
तिला काहीच कमी पडू देत नाही
पण तिने तिच्या प्रेमावर बोट ठेवलं
की तिचा हातच दुसऱ्याच्या हाती देतात
समाजाच्या भीतीपोटी
पोरीच्या निवडीवर विश्वास असूनही
हिंमत होत नाही
तिच्या अभिव्यक्तीला किंमत देण्याची..?

स्वप्नांच्या पावलांना 
प्रतिष्ठेचं पैंजण घालून
मनाविरुद्ध दुसऱ्याच्या उंबऱ्यावरचं माप लाथाडायला
लावणाऱ्या बापाला 
ती कधीच माफ करत नाही..
कारण त्यांनी तिच्या
स्त्रीजन्माचचं माप काढलेलं असतं..?

आईला समजत असते प्रत्येक लेकीची घुसमट 
पण
 " तुला काय कळत 
अक्कल नाही
पायातली चप्पल पायातच "
" आई " होण्याआधी "बाई "म्हणून 
तिनेही भोगलेली असते 
स्त्री असण्याची जन्मजात सजा..?
continue..... #freebird
#माणूस_म्हणून_चुकलेला_बाप..?
(पार्ट-2)
तू बोट ठेवशील ते तुझं "
ही धमक दाखवणारे
तिला काहीच कमी पडू देत नाही
पण तिने तिच्या प्रेमावर बोट ठेवलं
की तिचा हातच दुसऱ्याच्या हाती देतात
समाजाच्या भीतीपोटी
पोरीच्या निवडीवर विश्वास असूनही
हिंमत होत नाही
तिच्या अभिव्यक्तीला किंमत देण्याची..?

स्वप्नांच्या पावलांना 
प्रतिष्ठेचं पैंजण घालून
मनाविरुद्ध दुसऱ्याच्या उंबऱ्यावरचं माप लाथाडायला
लावणाऱ्या बापाला 
ती कधीच माफ करत नाही..
कारण त्यांनी तिच्या
स्त्रीजन्माचचं माप काढलेलं असतं..?

आईला समजत असते प्रत्येक लेकीची घुसमट 
पण
 " तुला काय कळत 
अक्कल नाही
पायातली चप्पल पायातच "
" आई " होण्याआधी "बाई "म्हणून 
तिनेही भोगलेली असते 
स्त्री असण्याची जन्मजात सजा..?
continue..... #freebird