Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्य कळून जातं.. एक चुराडा झालेलं स्वप्न थरथरत्

आयुष्य कळून जातं..

एक चुराडा झालेलं स्वप्न
थरथरत्या ओंजळीतून गळताना.
फाटून जातं मनाचं आभाळ
अश्रू स्वाभिमानाचे ढाळताना..

इथं रक्ताची नातीही
परक्यासारखी वागू लागतात..
सावत्र आईच्या नजरेने
दुरून बघू लागतात..

पाण्यावाचून वाळलेल्या झाडाचं
उन्हालाही काही कळत नाही..
ढग भरून आल्याशिवाय
खाली थेंबही गळत नाही..

गिळून घेतलेला आपमान
धमन्यातून उसळत राहतो..
इथं दुनियेच्या ईर्षेनं
जीव तळमळत राहतो..

निव्वळ वाऱ्याच्या वणव्यात
अख्खं वय जळून जातं..
शून्यातून वर येताना
आयुष्य कळून जातं..!
copyright @kganesh
9028110509 आयुष्य कळून जातं..
आयुष्य कळून जातं..

एक चुराडा झालेलं स्वप्न
थरथरत्या ओंजळीतून गळताना.
फाटून जातं मनाचं आभाळ
अश्रू स्वाभिमानाचे ढाळताना..

इथं रक्ताची नातीही
परक्यासारखी वागू लागतात..
सावत्र आईच्या नजरेने
दुरून बघू लागतात..

पाण्यावाचून वाळलेल्या झाडाचं
उन्हालाही काही कळत नाही..
ढग भरून आल्याशिवाय
खाली थेंबही गळत नाही..

गिळून घेतलेला आपमान
धमन्यातून उसळत राहतो..
इथं दुनियेच्या ईर्षेनं
जीव तळमळत राहतो..

निव्वळ वाऱ्याच्या वणव्यात
अख्खं वय जळून जातं..
शून्यातून वर येताना
आयुष्य कळून जातं..!
copyright @kganesh
9028110509 आयुष्य कळून जातं..