Nojoto: Largest Storytelling Platform

सखे.. पुसटल्या आहेत त्या पाऊल खुणा ज्यांनी आयुष्यभ

सखे..
पुसटल्या आहेत
त्या पाऊल खुणा
ज्यांनी
आयुष्यभर काळजात
घर केलं होतं...
होय सखे
त्याच पाऊलखुणा
ज्यांनी उध्वस्त केलं
माझं आयुष्य..
माझं जीवन..
माझं जगणं...
क्षणात.
सखे..
तुझे तेच पाऊल
तुझी तीच खुण
पुसटशी जरी लागते चाहूल..
काळीज धस्स.. करतंय.
मी ठेवलंय
स्वतःला 
बंदिस्त साखळदंडात
जखडून..
पण तरीही
अंतर्मनातील
गाभाऱ्यात
पुन्हा शोधतो मी
तुझ्या जपलेल्या
पाऊलखुणा...
होय
तुझ्याच पाऊलखुणा...
                      ( आशाई )
              प्रकाश तोटेवाड
              पंढरपूर पाऊलखुणा
सखे..
पुसटल्या आहेत
त्या पाऊल खुणा
ज्यांनी
आयुष्यभर काळजात
घर केलं होतं...
होय सखे
त्याच पाऊलखुणा
ज्यांनी उध्वस्त केलं
माझं आयुष्य..
माझं जीवन..
माझं जगणं...
क्षणात.
सखे..
तुझे तेच पाऊल
तुझी तीच खुण
पुसटशी जरी लागते चाहूल..
काळीज धस्स.. करतंय.
मी ठेवलंय
स्वतःला 
बंदिस्त साखळदंडात
जखडून..
पण तरीही
अंतर्मनातील
गाभाऱ्यात
पुन्हा शोधतो मी
तुझ्या जपलेल्या
पाऊलखुणा...
होय
तुझ्याच पाऊलखुणा...
                      ( आशाई )
              प्रकाश तोटेवाड
              पंढरपूर पाऊलखुणा