Nojoto: Largest Storytelling Platform

देवा आधीच त्रास होता डोळ्यातल्या पावसाचा आता पूर

देवा आधीच त्रास होता डोळ्यातल्या पावसाचा 
आता पूर घेत आहे दरमानसी प्राण दिवसाचा 

ती मायमाऊली बिचारी पाण्यात पोर शोधत बसली
सोड रे गैरसमज सगळे बस तूच एक पोर नवसाचा 

आधीच गावात सगळा आठवणींचा सागर होता 
मग का आखला तू आणखी बेत पूरपावसाचा 

तुझ्याचसाठी सगळे त्यांचे वारीउपवास होते 
मग उगाच का झाला तू शिरजोर माणसाचा 

मानले ही मी तू गरजेला कधी पाऊस देत नसतो 
पण शेतीच मारणारा कसला अत्याचार पावसाचा

सोड सोडनारे आता तुझे जीवघेणे हट्ट सगळे 
दे आवाज संकटांना अन कर विचार पावसाचा 

                   - गोविंद अनिल पोलाड
                 ( विद्रोही कवी विचारमंच )
देवा आधीच त्रास होता डोळ्यातल्या पावसाचा 
आता पूर घेत आहे दरमानसी प्राण दिवसाचा 

ती मायमाऊली बिचारी पाण्यात पोर शोधत बसली
सोड रे गैरसमज सगळे बस तूच एक पोर नवसाचा 

आधीच गावात सगळा आठवणींचा सागर होता 
मग का आखला तू आणखी बेत पूरपावसाचा 

तुझ्याचसाठी सगळे त्यांचे वारीउपवास होते 
मग उगाच का झाला तू शिरजोर माणसाचा 

मानले ही मी तू गरजेला कधी पाऊस देत नसतो 
पण शेतीच मारणारा कसला अत्याचार पावसाचा

सोड सोडनारे आता तुझे जीवघेणे हट्ट सगळे 
दे आवाज संकटांना अन कर विचार पावसाचा 

                   - गोविंद अनिल पोलाड
                 ( विद्रोही कवी विचारमंच )