Nojoto: Largest Storytelling Platform

तू आलीस चंद्रिके मज पुन्हा न्याहाळाया निज आधीच ना

तू आलीस चंद्रिके 
मज पुन्हा न्याहाळाया
निज आधीच नाही डोळा
 सारी रात जागवाया
तू ग आभाळी दूर अशी
सांग देऊ कसा मी कुशी
तुज निज नाही या तमा
मज आली सतावया
तेज डोळ्यांतले तुझ्या 
मज निजूच देईना
टक रोखलेली नजर ती 
मज बंदिवान कराया
मज ठाऊक तव एकांत
रोज येणे या भयाण तिमिरात
तुज हवासा मी सोबती
गुज मनीचे ऐकवाया
मन उलगडत जाईल
तशी वाढशील सारं सामावया
राहशील तिथे जागशील काही काळ
तुही देशील निरोप येण्याआधीच सकाळ
अशा निरोपाची मज सवयच झाली
गुंता सुटता सुटेना गाठ उराशी गाठली
तुझ्या एकांताचा भार मज एकांती दे ना
काही क्षण दोन एकांत 
एक क्षण निवांत घालवाया #rayofhope #chandrika #chandani #nij #ekant #Love #Life
तू आलीस चंद्रिके 
मज पुन्हा न्याहाळाया
निज आधीच नाही डोळा
 सारी रात जागवाया
तू ग आभाळी दूर अशी
सांग देऊ कसा मी कुशी
तुज निज नाही या तमा
मज आली सतावया
तेज डोळ्यांतले तुझ्या 
मज निजूच देईना
टक रोखलेली नजर ती 
मज बंदिवान कराया
मज ठाऊक तव एकांत
रोज येणे या भयाण तिमिरात
तुज हवासा मी सोबती
गुज मनीचे ऐकवाया
मन उलगडत जाईल
तशी वाढशील सारं सामावया
राहशील तिथे जागशील काही काळ
तुही देशील निरोप येण्याआधीच सकाळ
अशा निरोपाची मज सवयच झाली
गुंता सुटता सुटेना गाठ उराशी गाठली
तुझ्या एकांताचा भार मज एकांती दे ना
काही क्षण दोन एकांत 
एक क्षण निवांत घालवाया #rayofhope #chandrika #chandani #nij #ekant #Love #Life