अवघं बत्तीस वर्ष आयुष्य जगलेला.. तब्बल साडेतीनशे वर्ष विस्मरणात गेलेला.. तरीही आजतागायत प्रजेच्या मनावर अधिराज्य गाजविणारा.. पित्याने रोवलेलं एक रोपटं आणि त्या रोपटयाचं झालेलं एक विशाल वृक्ष म्हणजेच स्वराज्य,.. या स्वराज्यावर आलेल्या असंख्य वादळाना निधड्या छातीने सामोरे जाऊन त्यांवर मात करणारा... वाघाच्या जबड्यात हात घालुनी दात मोजण्याचं धाडस ठेवणारा ... शत्रूला सुध्दा माहीत होतं की हा सह्याद्रीचा वारा आहे आणि सह्यादीचा वारा कधीही कैद होणार नाही,, आणि म्हणूनच फितूरीने कैद केला गेलेला... चाळीस दिवस मृत्यला सुध्दा हातात धरून ठेवणारा.. आणि नक्कीच जेव्हा मृत्यु आला तेव्हा मृत्यु सुध्दा पावन झाला असेल असा.. पित्यापेक्षा पुत्र सरस याची वृत्ती सर्व जगाला दाखवून देणारा.. अवघ्या आयुष्यात एकही युध्द न हरणारा.. माझा राजा छत्रपती संभाजी महाराज.. ज्यांच्या मुळे ह्या सह्याद्रीचा कणा कायम ताठ राहिला अशा महायोद्धयाला विनम्र अभिवादन ... #chhtrpati shabhu raje jayanti