Nojoto: Largest Storytelling Platform

कधीकधी सारं काही कळतं पण न कळल्यासारखं राहावं लागत

कधीकधी सारं काही कळतं
पण न कळल्यासारखं राहावं लागतं
चालाक लोकांच्या ह्या दुनियेत मात्र
अगदी भोळे बनून फिरावं लागतं..

अनुभवातून शिकतं माणूस बरंच काही
पण,काहीच समजत नसल्यासारखं वागावं लागतं
आपलेच इथे दगा करतात हे माहित असतानासुद्धा
काही आयुष्य त्यांच्याचसोबत जगावं लागतं..

दिसतात किंवा वागतात तसे नसतात सगळेच इथे
पण ,तरीही सगळं सहन करावं लागतं
मिळेल एक ना एक दिवस कर्माची शिक्षा प्रत्येकाला
आपण फक्त त्यांच्याकडे बघत राहावं लागतं..

कोणी कसेही वागूद्या आपल्यासोबत
आपण मात्र नेहमी प्रामाणिक राहावं लागतं 
होईल त्यांनाही चुकी केल्याचा पच्छाताप 
फक्त त्यांना ही तसा दिवस दिसाव लागतं ...

खोटं कधीच लपत नसतं 
शेवटपर्यंत हेच सत्य मनात असावं लागतं 
कितीही करा तुम्ही लपवाछपवी
पण खरं ही एक दिवस दिसायला लागतं.

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #DhakeHuye
कधीकधी सारं काही कळतं
पण न कळल्यासारखं राहावं लागतं
चालाक लोकांच्या ह्या दुनियेत मात्र
अगदी भोळे बनून फिरावं लागतं..

अनुभवातून शिकतं माणूस बरंच काही
पण,काहीच समजत नसल्यासारखं वागावं लागतं
आपलेच इथे दगा करतात हे माहित असतानासुद्धा
काही आयुष्य त्यांच्याचसोबत जगावं लागतं..

दिसतात किंवा वागतात तसे नसतात सगळेच इथे
पण ,तरीही सगळं सहन करावं लागतं
मिळेल एक ना एक दिवस कर्माची शिक्षा प्रत्येकाला
आपण फक्त त्यांच्याकडे बघत राहावं लागतं..

कोणी कसेही वागूद्या आपल्यासोबत
आपण मात्र नेहमी प्रामाणिक राहावं लागतं 
होईल त्यांनाही चुकी केल्याचा पच्छाताप 
फक्त त्यांना ही तसा दिवस दिसाव लागतं ...

खोटं कधीच लपत नसतं 
शेवटपर्यंत हेच सत्य मनात असावं लागतं 
कितीही करा तुम्ही लपवाछपवी
पण खरं ही एक दिवस दिसायला लागतं.

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #DhakeHuye