सारे म्हणतात मी कविता करते नाही ओ मी तर शब्दांना ओळीत गुंफते सारे म्हणतात मी कविता करते खरंतर मनातली भावना मी शब्दात उतरवते सारे म्हणतात मी कविता करते कधी कधी समोरच्याच्या मनाचा शब्दात ठाव घेते सारे म्हणतात मी कविता करते कधीतरी कुणाच्या वेदनांना शब्दरूपी मलम लावते सारे म्हणतात मी कविता करते माझ्या शेतकरी बांधवांच्या कष्टाचे ऋण शब्दात मांडते सारे म्हणतात मी कविता करते मनापासून सैनिकांनाच्या देशप्रेमाला शब्दांनी सलामी देते सारे म्हणतात मी कविता करते खरतर शब्दातून वाचणाऱ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सुप्रभात मित्रानों💕 जेव्हापासुन तुम्ही लिहायला सुरु केलयं तर सारे म्हणतातचं अरे तु कविता करते किंवा करतो. हे प्रत्येक लिहाणार्या व्यक्तीसोबत झालेल आहे. अरे व्वा हे तू लिहीलस? ते मस्त लिहीलं हं. हा प्रवास. मग आज हेच लिहायचयं सारे म्हणतात मी कविता करते/करतो...