Nojoto: Largest Storytelling Platform

मर्द निधड्या छातीची पोलादी ढाल करून डरकाळी वाघाची

मर्द निधड्या छातीची
पोलादी ढाल करून
डरकाळी वाघाची फोडतोय..
रक्षण करण्या मायभूमिचे
छुप्या गनिमी पहाडानाही
अख्खं मुळासकट तोडतोय..
नभात उडणाऱ्या गरुडाची
रक्तात जिद्द घेऊन
मातीवर लोळत नाही..
दुष्ट शत्रूच्या काफिल्यावर
शौर्याचा इतिहास रचतो
डरपोक खेळत नाही...
काळ्याकुट्ट अंधाऱ्या रात्री
छुप्या काळ्या शत्रूवर
ठेवावा लागतो पहारा..
भयाण गर्द जंगल
कधी हिंस्र प्राणी
नसतो जीवाला निवारा...
व्याकुळ एकांतात जीवाला
बायको अन् चिमुकल्यासह
गावाकडचा लळा आठवतो..
दिमाखदार तिरंगा पाहून
थकलेल्या निष्ठावंत डोळ्यात
आसवांचा पूर साठवतो...
संकट समयी दऱ्याखोऱ्यातून
निस्सीम देशभक्तीचा वारा
अंगभर सळसळत राहतो..
वाघ जखमी झाला तरी
डोळ्यात आग घेऊन
जीव तळमळत राहतो...
ऐका माझ्या देशवासीयांनो
रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत
ओझं देशभक्तीचं पेलतोय..
पाठीवर हात ठेऊन
तुम्ही फक्त लढ म्हणा
मी फौजी बोलतोय..
  कवी-गणेश खरात
  ९०२८११०५०९ फौजी बोलतोय...
मर्द निधड्या छातीची
पोलादी ढाल करून
डरकाळी वाघाची फोडतोय..
रक्षण करण्या मायभूमिचे
छुप्या गनिमी पहाडानाही
अख्खं मुळासकट तोडतोय..
नभात उडणाऱ्या गरुडाची
रक्तात जिद्द घेऊन
मातीवर लोळत नाही..
दुष्ट शत्रूच्या काफिल्यावर
शौर्याचा इतिहास रचतो
डरपोक खेळत नाही...
काळ्याकुट्ट अंधाऱ्या रात्री
छुप्या काळ्या शत्रूवर
ठेवावा लागतो पहारा..
भयाण गर्द जंगल
कधी हिंस्र प्राणी
नसतो जीवाला निवारा...
व्याकुळ एकांतात जीवाला
बायको अन् चिमुकल्यासह
गावाकडचा लळा आठवतो..
दिमाखदार तिरंगा पाहून
थकलेल्या निष्ठावंत डोळ्यात
आसवांचा पूर साठवतो...
संकट समयी दऱ्याखोऱ्यातून
निस्सीम देशभक्तीचा वारा
अंगभर सळसळत राहतो..
वाघ जखमी झाला तरी
डोळ्यात आग घेऊन
जीव तळमळत राहतो...
ऐका माझ्या देशवासीयांनो
रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत
ओझं देशभक्तीचं पेलतोय..
पाठीवर हात ठेऊन
तुम्ही फक्त लढ म्हणा
मी फौजी बोलतोय..
  कवी-गणेश खरात
  ९०२८११०५०९ फौजी बोलतोय...