Nojoto: Largest Storytelling Platform

अन् रवी उगवला नाही पाहण्यास आज रवीस सजूनी पहाट आल

अन् रवी उगवला नाही

पाहण्यास आज रवीस
सजूनी पहाट आली
शृंगार वाट पाहे
अन् रवी उगवला नाही

चमकूनी दवबिंदू ते
थबकले पानांवरी
भ्रमरही गुंजारव मग
करु लागले सुमनांवरी

दाट धुक्यात त्या
पहाटही सज्ज होती
नेसुन शालू हिरवा
प्रतिक्षेत उभी होती

प्रसन्नतेचा शुभ्र पिसारा
अतुरता ही वाढलेली
क्रूर मेघ दाटून गडद
वाट रवीची रोखलेली

✍️निशा खरात/शिंदे
(काव्यनिश)

©nisha Kharatshinde अन् रवी उगवला नाही
अन् रवी उगवला नाही

पाहण्यास आज रवीस
सजूनी पहाट आली
शृंगार वाट पाहे
अन् रवी उगवला नाही

चमकूनी दवबिंदू ते
थबकले पानांवरी
भ्रमरही गुंजारव मग
करु लागले सुमनांवरी

दाट धुक्यात त्या
पहाटही सज्ज होती
नेसुन शालू हिरवा
प्रतिक्षेत उभी होती

प्रसन्नतेचा शुभ्र पिसारा
अतुरता ही वाढलेली
क्रूर मेघ दाटून गडद
वाट रवीची रोखलेली

✍️निशा खरात/शिंदे
(काव्यनिश)

©nisha Kharatshinde अन् रवी उगवला नाही