Nojoto: Largest Storytelling Platform

#विरलेला गाव माझा.... जाते म्हणतेस हरकत नाही कढत

#विरलेला गाव माझा....
जाते म्हणतेस हरकत नाही 
कढत असलेले अश्रू पाहून जा 
नाते तोडतेस हरकत नाही 
विझता श्वास माझा पाहून जा
जाणून सारे संपवताना 
हीच एवढी विनंती 
हसते आहेस हरकत नाही 
बुडती नाव माझी पाहून जा 
जाळते आहेस हरकत नाही 
जळणारे गाव पाहून जा 
जाताना एकदा तरी नजर
मागे उरलेल्या पाऊलखुणांवर
सहजपणे वळवून जा
इतरांना नाही निदान मला
एकदा तरी कळवून जा
मन ही अशीच जुळत नसतात
रूजलेल्या जीवन बागेतली विझलेली
ही मनाची कळी पुन्हा
एकदा फुलवून जा
प्रेम केलंय काही नाटक नाही
सगळे हिशेब प्रेमाचे पुन्हा
एकदा नव्यानं जुळवून जा
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #माझा_एकांत_आणि_मी
#विरलेला गाव माझा....
जाते म्हणतेस हरकत नाही 
कढत असलेले अश्रू पाहून जा 
नाते तोडतेस हरकत नाही 
विझता श्वास माझा पाहून जा
जाणून सारे संपवताना 
हीच एवढी विनंती 
हसते आहेस हरकत नाही 
बुडती नाव माझी पाहून जा 
जाळते आहेस हरकत नाही 
जळणारे गाव पाहून जा 
जाताना एकदा तरी नजर
मागे उरलेल्या पाऊलखुणांवर
सहजपणे वळवून जा
इतरांना नाही निदान मला
एकदा तरी कळवून जा
मन ही अशीच जुळत नसतात
रूजलेल्या जीवन बागेतली विझलेली
ही मनाची कळी पुन्हा
एकदा फुलवून जा
प्रेम केलंय काही नाटक नाही
सगळे हिशेब प्रेमाचे पुन्हा
एकदा नव्यानं जुळवून जा
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #माझा_एकांत_आणि_मी