Nojoto: Largest Storytelling Platform

White आयुष्य आयुष्याच्या वाटेवर दुःख खूप येतील, पू

White आयुष्य
आयुष्याच्या वाटेवर दुःख खूप येतील,
पूर्ण होतील काही स्वप्न काही अपुरीच राहतील..

कधी आपण हसू तर,कधी आपण रडू...
आयुष्याच्या शर्यतीत, उंच उंच उडू ....

मानव आहोत आपण ,आहे आपल्याकडे मन..
आयुष्यात येतील ,सुख दुःखाचे क्षण...

सुखामध्ये हसणार आपण,दुखामध्ये रडणार....
मात घालुनी दुःखाला,वेळेबरोबर पळणार...

आयुष्य आहे शर्यत ,त्यात सहभागी आपण होऊ...
मृत्यू येईपर्यंत त्याच्याशी लढा आपण देऊ...

कुणी असतो भाऊ तर,कुणी असतो पिता
कुणी असते ताई तर,कुणी असते माता. .

आयुष्यात असे हे नाते,जुळलेले असतात...
त्याच्यासाठी डोळ्यात ,स्वप्न नवी  सजतात...

त्या स्वप्नांना पूर्ण करत,आयुष्य हे संपते...
तरी म्हणतो देवा,थोडे आयुष्य जास्त दिले असते...

शेवटपर्यंत आपण लढत असतो जीवनाशी,
सामोरे जाता जाता त्याला,भेटतो मृत्यूशी...

मृत्यू म्हणतो चल आता,वेळ तुझी आली...
खूप जगला आयुष्य,आता माझी बारी...

©Priyanka Jaiswal
  #आयुष्य