शरीरावर प्रेम करणाऱ्यांना मनाचं प्रेम कसं कळणार नात्यात विश्वासघात करणाऱ्यांना हृदयावरचा घाव कसं कळणार... नको ती बंधने लादली स्वतःवर प्रेमातली मोकळीक त्यांना कशी कळणार शरीरावर आकर्षित होणाऱ्यांना मनाचं चुंबकत्व कसं कळणार... अडकले कायमचे कचाट्यात जे जातीधर्माच्या त्यांना माणुसकी काय कळणार ज्यांना माणुसकी च कळली नाही त्यांना प्रेम तरी कसं कळणार...? ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Thinking कविता मराठी प्रेम मराठी प्रेम संदेश मराठी प्रेम कविता