गूढ....! हा नजराणा कि नजरेची कलाकारी... हि तुझी अदाकारी की अदांची दादागिरी...! मी तुला चोरून पाहतोय हे हेरून तू होते बावरी... तू हलकेच वळून पाहत घाव घालतेस काळजावरी..! मी हरलो कि हरवून गेलो कळेना मला सुंदरी... मी भरुन पावलो कि भरकटून गेलो तुझ्या आहारी..! वाऱ्यावर केसांची तुझ्या हलचाल ती होणारी... कि हृदयावर माझ्या ती बट चाल करून येणारी..! जीव गेला मात्र जीवंतपणाची जाणीव उरी... बेसावध सावज मी अन् तू सावध शिकारी...! ते गूढ हास्य पाहून तुझ्या ओठांवरी... वाहावत जाणारा मी पुन्हा येतो काठावरी...! ना भाव तुझा,ना ठाव तुझा कळला मला आज जरी फिरूनी पुन्हा येईन मी फिरतो आता भले माघारी..! -संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. #dilbechara #गूढ गूढ....! हा नजराणा कि नजरेची कलाकारी... हि तुझी अदाकारी की अदांची दादागिरी...!