ती प्रीतीची रात्र, तो मिठीतला बहर ढगाचा गडगडाट व चमकनाऱ्या विजेचा प्रकाश त्या भयाण अंधारात, तीही चिंब मीही चिंब आणि दोघांच्या नजरेत, प्रेमाचे प्रतिबिंब तो तिच्या गालावरचा पडणारा ओला थेंब आणि ती पावसाची ओली सर, दोघांचे ओठावर ओठ आणि मनही अधीर, तेव्हा मनात हेच वाटायचं की, हा येणारा प्रेमाचा पाऊस, कधीच न थांबावं. आणि आम्ही दोघेही नेहमी, अशाच पावसात चिंब भिजावं, ह्या पावसात इतकं बेधुंद होऊन जावं की, अनुभवलेले हे पावसाचे क्षण आम्ही दोघांनी कधीच न विसरावं.... (प्रीत ) पावसाच्या आठवणी