नितळ, सोज्वळ ,पवित्र अतुट नाते | भाऊ बहिणीचे एक तेजस्वी नाते || भावा बहिणीचे अनोखे नाते | कधी हसून ,तर कधी रडवून अतूट बंधन|| औचित्य साधून भाऊ तुला मी औक्षण करते | माथी लावते गंध , आपल्या नात्याचा अतूट बंध || संकट काळी माझी औक्षण तुझे रक्षण करेल| आपल्या भावा-बहिणीच्या नात्याची वेल बहरले || प्रेमाचा आणि मायेचा भाऊबीज सण| चेहऱ्यावर हर्ष आणणारा भाऊबीज हा सण || रक्ताचा आणि मानलेला भाऊ अतुट नाते | कधीही न तुटणारे मायेचे पवित्र नाते || भावा-बहिणीच्या नात्याची माळ फुलत राहो| मनी असलेले स्वप्न साकार होत राहो|| -✍️ Shital K. Gujar✍️ 🤩 भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा🤩 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भाऊबीज... #भाऊबीज2020 सर्वांना भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai