Nojoto: Largest Storytelling Platform

सह्याद्रीच्या कुशीत जन्मल्या नररत्नाच्या खाणी जिजा

सह्याद्रीच्या कुशीत जन्मल्या नररत्नाच्या खाणी
जिजाऊंच्या धवलकीर्तीची गातो आम्ही गाणी।।धृ।।

हिंदमातेच्या भाळावरती ऋषितुल्य शोभली
सिंदखेडच्या जाधवांची जिजाऊ माऊली
नरझुंजार शिवबाच्या दुर्गामातेची सावली
रयतेचा जुलुमी अंधार दूर करण्या धावली
यवनी साम्राज्यांना दाविले तलवारीचे पाणी
जिजाऊंच्या धवलकीर्तीची गातो आम्ही गाणी।।१।।

संतांच्या मंदियाळीस दिले संरक्षण
मावळ्यांच्या पराक्रमाचे केले औक्षण
शेतकऱ्यांच्या शेताचे करण्या रक्षण
 शिवबाकडून केले जुलमांचे भक्षण
हिंदवी स्वराज्याची शोभे महाराणी
जिजाऊंच्या धवल कीर्तीची गातो आम्ही गाणी।।२।। जिजामाता  महाराष्ट्र माऊली

जिजामाता महाराष्ट्र माऊली