Nojoto: Largest Storytelling Platform

#OpenPoetry स्वप्न जन्मोजन्मीचे आज पूर्ण झाले सार

#OpenPoetry स्वप्न जन्मोजन्मीचे आज पूर्ण झाले 
सारी बंधने तोडून मी तुझ्याकडे आले !

मी जवळ असले की सारखा माझ्याशी भांडतोस तू 
लांब जायला लागले तर का येवढा रडतोस तू ?
तुझ्या ह्या वेडेपणावर मी आज फिदा झाले... 

नेहमी काळजी घेतोस माझी समजूनसुद्धा घेतोस 
लहान बाळा सारखा हट्टसुद्धा करतोस 
तुझे सगळे हट्ट जणू आज पूर्ण झाले.... 

आपल्या घराच्या उंबरठ्यावर मापं ओलांडताना
शहारून गेले मी सुख डोळ्याने पाहताना 
कौतुकाच्या नजरेने मी आज तृप्त झाले.... 

सात जन्माचं बंधन आपलं सात जन्माची साथ
मी तुझी तू माझा नाही सुटणार हातातून हात 
तुझ्या प्रेमाच्या हाकेला साद देत आले..... #स्वप्न

jugalmadwal6738

Jugal Madwal

New Creator