Nojoto: Largest Storytelling Platform

या जगण्याचा आशय थोडा शब्दबध मी करून पाहिला अर्थ

या जगण्याचा आशय थोडा 
शब्दबध मी करून पाहिला 
अर्थ लागला हास्य कधी तर 
पापण्याआडचा काठ ओला 

कधी मनीचा भाव कळाला 
तर कधी कुणाचे दुःख 
शब्दांनी मन हलके केले 
आणले चेहऱ्यावरती सुख 

याला कोणी कविता म्हणते 
कोणी म्हणते गीत 
भाव मनीचा सांगून जातो 
कवी शब्दात प्रीत 

असाच आहे प्रवास थोडा 
शब्दांसोबतच्या आयुष्याचा 
कवितेला जन्म देऊन 
हलक्या झालेल्या या मनाचा 

                   ✍️सुधाकर लोकरे

©Sudhakar Lokare
या जगण्याचा आशय थोडा 
शब्दबध मी करून पाहिला 
अर्थ लागला हास्य कधी तर 
पापण्याआडचा काठ ओला 

कधी मनीचा भाव कळाला 
तर कधी कुणाचे दुःख 
शब्दांनी मन हलके केले 
आणले चेहऱ्यावरती सुख 

याला कोणी कविता म्हणते 
कोणी म्हणते गीत 
भाव मनीचा सांगून जातो 
कवी शब्दात प्रीत 

असाच आहे प्रवास थोडा 
शब्दांसोबतच्या आयुष्याचा 
कवितेला जन्म देऊन 
हलक्या झालेल्या या मनाचा 

                   ✍️सुधाकर लोकरे

©Sudhakar Lokare